MNS Raj Thackeray  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: मनसे राज्यात सर्वाधिक जागा लढवणार; राज ठाकरेंचा सत्तेत येण्याचा निर्धार

MNS : राज ठाकरे यांनी निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवणार असल्याची घोषणा करत आपण सत्तेत येणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महायुती आणि मविआचं टेन्शन वाढलंय.

Snehil Shivaji

विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली आणि सगळ्यांच्या नजरा राज ठाकरेंकडे वळल्या. गेल्या निवडणूकीत केवळ एक आमदार निवडून आणलेल्या राज ठाकरेंनी यंदा थेट सत्तेत बसण्याचा निर्धार केलाय. नेमकं कशाचा जोरावर आणि कोणती रणनीती राज ठाकरेंनी आखली आहे. पाहूया हा एक रिपोर्ट.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी एकदा जे बोललो ते बोललो आता माघार नाही असं म्हणत सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी महायुती आणि मविआचं टेन्शन वाढवलं. एवढंच नव्हे तर निवडणुकांनंतर सत्तेत येणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.

राजकारणात शत्रूचा शत्रू आपला मित्र या नितीनं शिवसेना फुटल्यानंतर गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये वाढलेली कमालीची जवळीक अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. तसंच लोकसभेत भाजपला राज ठाकरेंनी दिलेला बिनशर्थ पाठिंब्यानं आणि ठाकरेंनी घेतलेल्या सभांमुळे महायुतीला झालेल्या फायद्यांनं राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी महायुतीचे दारं उघडं आहे असं वाटत असतांना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूकीत एकला चलो रे चा नारा दिला. मात्र सत्तेत येण्याचा निर्धार केल्यामुळे राज ठाकरे महायुतीसोबत हात मिळवणी करण्याची शक्यता आहे. पाहूयात राज ठाकरेंच्या मनसेचा पक्षस्थापनेपासूनचा लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमधील आलेख

विधानसभेतील मनसेची कामगिरी

2009 मध्ये मनसेनं 143 जागा लढवल्या आणि 5.71% मतं मिळवत 13 आमदार निवडून आणले

2014 मध्ये मनसेनं 219 जागा लढवल्या आणि 3.15% मतं मिळवत एक आमदार निवडून आणला

2019 मध्ये मनसेनं 110 जागा लढवल्या आणि 2.25 % मतं मिळवत पुन्हा केवळ एकच आमदार निवडून आणला.

लोकसभेतील मनसेची कामगिरी

2009 ला मनसेनं 11 जागा लढवत 4.1 % मतं मिळवली

2014ला भाजपला पाठींबा देत 10 जागा लढवल्या आणि 1.5 % मतं मिळवली

त्यानंतर 2019 मनसेनं मोदींना विरोध करत निवडणूक न लढवता मोदींविरोधात सभा घेतल्या

2024 मध्ये लोकसभेला राज ठाकरेंनी पुन्हा उमेदवार न देता मोदींना बिनशर्थ पाठिंबा देत मोदींसाठी 4 सभा घेतला.

मतांची ही आकडेवारी पाहता स्थापनेपासून जनता मनसेला नाकारते असंच दिसतंय. तेव्हा गेल्या निवडणूकीत मला सत्तेऐवजी विरोधी पक्षनेतेपद द्या असं आवाहन करत 110 जागा लढवणाऱ्या राज ठाकरेंनी यंदा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त जागा आपण लढवू आणि सत्तेत बसू असं जाहिर केलं. राज ठाकरे पुन्हा आपला करिष्मा दाखवतील की ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांचं विभाजन करतील हे येणाऱ्या निवडणूकीच्या निकालातच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT