Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होणार? भाजप आमदारांना धडकी; अनेकांची झोपच उडाली

BJP Maharashtra Assembly Election Formula : अशातच अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतामुळे भाजप आमदारांना धडकी भरली आहे.

Satish Daud

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. २७ पैकी केवळ ९ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होता कामा नये यासाठी भाजप हायकमांड आता सतर्क झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. सध्या अमित शहा महाराष्ट्राच्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेत भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहे.

अशातच अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतामुळे भाजप आमदारांना धडकी भरली असून अनेकांची झोप उडाली आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील बैठकीत गुजरात पॅटर्नचा किस्सा देखील सांगितला आहे.

काय म्हणाले अमित शहा?

"जेव्हा मी ३५ वर्षांचा होतो, तेव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षाने माझे तिकीट कापले होते. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशालभाऊ ठाकरे माझ्याकडे आले होते. तेव्हा मी खूप दु:खी आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा तू अजिबात पक्षाचा प्रचार करू नकोस. दु:खी मनाने कोणताही माणूस चांगले काम करू शकत नाही", असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचं शहा म्हणाले.

एखादा नेता जर पक्षाने तिकीट कापल्यावर नाराज असेल तर त्याची घरी जाऊन समजून काढावी लागते, तो कार्यकर्ता नाहीच असं कुशालभाऊ ठाकरे मला सांगून गेले आहेत, असा किस्सा अमित शहा यांनी सांगितला. दरम्यान, अमित शहा यांच्या या उदाहरणामुळे विधानसभेत महाराष्ट्रात (Maharashtra Assembly Elections 2024) देखील गुजरात पॅटर्न लागू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचा गुजरात पॅटर्न काय?

२०२२ मध्ये गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपवर मतदारांची मोठी नाराजी होती. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं ९९ विद्यमान आमदारांपैकी तब्बल ५८ आमदारांचे तिकीट कापले होते. या जागेवरून भाजपने नवीन उमेदवार उभे केले, ज्यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून मतदान केले. महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या १०३ इतके आहे. म्हणजेच ५० ते ६० आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे. हे आमदार नेमके कोण असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT