Shiv Sena Vs BJP Ramtek Assembly Constituency  Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी शिंदे गटाचा पहिला उमेदवार ठरला; भाजपमध्ये धडाधड राजीनामे पडणार?

Shiv Sena Vs BJP Ramtek Assembly Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

Satish Daud

रामटेक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातून अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात गेल्याचे निश्चित मानलं जातं आहे. दुसरीकडे आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला भाजप नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. जर त्यांची उमेदवारी मागे न घेतल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशाराही पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

त्यामुळे जागावाटपाआधीच महायुतीत वादाचे फटके फुटण्यास सुरुवात झाली आहे. आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युतीधर्म न पाळता भाजपच्या उमेदवाराविरोधात बंड केलं होतं. यानंतर जयस्वाल यांनी ठाकरे सरकारच्या काळात महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला होता.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जयस्वाल यांनी शिंदे यांची साथ दिली होती. तेव्हापासून ते मुख्यमंत्र्‍यांच्या संपर्कात होते. नुकताच सीएम एकनाथ शिंदे यांनी विदर्भाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पारशिवणीमध्ये विकास कामाच्या भूमिपूजनही केले. यावेळी आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर शिंदेंनी रामटेक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली.

यामुळे भाजपचे नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री येतात आणि मतदारसंघातून उमेदवारी घोषित करतात. त्यांनी आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे त्यांनी ज्या नावाची घोषणा केली, त्यांना आमचा विरोध आहे. आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीचा पुन्हा विचार करावा. आम्ही 5 वर्ष त्रास घेतला, रामटेकमध्ये पंचायत समिती, ग्राम पंचायतीला एकही रुपयांचा निधी मिळाला नाही, असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

आशिष जैस्वाल यांनी आमची कामे होऊच दिली नाही मग आम्ही त्यांचे काम कसं करू? असा सवालही भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांनी विचार करावा. एकनाथ शिंदे जेव्हा उमेदवारी जाहीर करत होते. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे झोपले होते का? असा संतापही भाजप पदाधिकारी व्यक्त केला. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मागे न घेतल्यास येत्या १७ तारखेला आम्ही धडाधड राजीनामे देऊ, असंही भाजप पदाधिकारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT