Maharashtra Political News Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर भाजपने सूरा खूपसण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना हे कदापि सहन करणार नाही, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला इशारा दिला.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics, Shiv Sena vs BJP : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपने बंडखोरी केल्यास शिवसेना शांत बसणार नाही असा सूचक इशारा दिला आहे.

भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर ,जिल्हाप्रमुख अरविंद मोरे , शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख मोरे यांनी भाजपविरोधी हा कडक इशारा दिला. यावेळी जिल्हाप्रमुख मोरे यांनी भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरून पाटील यांनी अपक्ष उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. 2019 साली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातही नरेंद्र पवार यांनी भाजपच्या विरुद्ध बंडखोरी केली होती. यावेळी देखील हे दोन्ही नेते बंडखोरीचे राजकारण करत असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी यांनी केली .

एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर सूरा खूपसण्याचा प्रयत्न केला, तर...

"भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे, मात्र आमची इस्टेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये," असे मोरे यांनी ठामपणे सांगितले. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर भाजपने सूरा खूपसण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना हे कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.भाजपने बंडखोरी केल्यास, शिवसेनेकडे कल्याण पूर्व, डोंबिवली, मुरबाड आदी प्रमुख मतदारसंघ असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भाजपचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार ,शहर अध्यक्ष वरून पाटील हे या मतदार संघात निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यानी तयारी सुरू केली आहे.त्यामुळे या मतदार संघात शिवसेना भाजप मध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रात्री उशिरा झोपताय? आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतील

Virat Kohli Birthday Special: शुटिंगदरम्यान पहिली भेट, प्रेम, ब्रेकअपच्या चर्चा अन् मॅचवेळी फ्लाइंग किस; विराट- अनुष्काची हटके लव्हस्टोरी

Erandol Vidhan Sabha : निवडणूक न लढविल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज; एरंडोल मतदारसंघातून ६० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा

Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?

Hyderabad Tourist Places: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT