Sanjay Raut vs Amit Shah Political News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : अमित शहा गुजरातमधून आलेले गांडा भाई; संजय राऊतांची जहरी टीका, फडणवीसांनाही सुनावलं

Sanjay Raut vs Amit Shah Political News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसल्यानंतर भाजप हायकमांड खडबडून जागं झालं आहे. आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रात बैठकांचा धडाकाच लावला आहे. नुकताच अमित शहा यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यातून त्यांनी भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केल्या. दरम्यान, शहा यांच्या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.

"अमित शहा गुजरातमधून आलेले गांडा भाई असून त्यांनी औरंगजेब प्रमाणे राज्यात तंबू ठोकला आहे. पण यामुळे महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर होत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे". राऊतांच्या या विधानामुळे महायुतीचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेथील मराठी माध्यमांसोबत संवाद साधला. राऊत म्हणाले, "इंडिया आघाडीतील सर्व नेते हरियाणाच्या प्रचाराला गुंतले असून तरीही मी दिल्लीत आलो आहे. अधून मधून दिल्लीला यावं लागतं. यावेळी मी कायदेशीर सल्ल्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अफवा समोर येत असतात. दिल्लीत आल्यावर त्याबाबत चर्चा होते".

"काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोले आणि खरगे यांच्यात काय बोलणं झालं, यावर दुसऱ्या पक्षाने कमेंट करणे योग्य नाही. पण खरगे यांनी काही सूचना केल्या असतील तर मी त्यांचं स्वागत करतो". अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करताना राऊत म्हणाले, "अमित शहा गुजरातमधून महाराष्ट्रात आलेले गांडा भाई आहेत. त्यांनी राज्यात औरंगजेबाप्रमाणे तंबू ठोकला आहे. पण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल"

अजित पवारांचा खेळ संपला : संजय राऊत

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर देखील चांगलंच तोंडसुख घेतलं. "एकनाथ शिंदे यांच्याकडे १ टक्का देखील मतदान नाही. अजित पवार यांच्याकडे स्वतःच मतदान असतं तर बारामतीत त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचं आहे. उर्वरित मते शिंदेंनी पैशांचा तसेच बळाचा वापर करून घेतली आहे".

"वापर करा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. २०२४ नंतर शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप कधीच काम करणार नाही. अजित पवार यांचा खेळ आता संपला आहे. फडणवीस यांची खदखद आम्हाला दिसून आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावरून त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राचा सिंघम समजू नये. काल कोरेगाव पार्कला एका अल्पवीन मुलीवर बलात्कार झाला. त्यामुळे हे मिस्टर सिंघम त्यांचा एन्काऊंटर करणार आहेत का?" असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

SCROLL FOR NEXT