Nashik Chandwad Assembly Constituency  Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठं खिंडार, शेकडो शिवसैनिकांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra Political News : विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी राजीनामे दिले आहेत.

Satish Daud

नाशिक : राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. नाशिकच्या चांदवड येथील शिवसेना तालुकाप्रमुखांसह शेकडो शिवसैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे हे राजीनामे देण्यात आले असून चांदवड तालुक्यात विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. चांदवड-देवळा मतदारसंघात तालुका विकास आघाडीचाच उमेदवार उभा करणार, असं शिंदे गटाचे माजी तालुकाध्यक्ष विकास भुजाडे यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेतील अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिंदे गटात गेले. मात्र, चांदवड मतदारसंघातील एकही कार्यकर्ता तसेच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. सर्वच कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठवान राहिले. त्यामुळे शिंदे गटाकडे चांदवड मतदार संघामध्ये कोणीही कार्यकर्ता नव्हता.

यावेळी मूळ भाजपशी संबंधित असलेले विकास भुजाडे यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला या सामूहिक राजीनाम्याला हीच नव्या तालुका प्रमुखाची परस्पर नियुक्ती निमित्त ठरली. शिंदे गटात प्रवेश करताच भुजाडे हे कामाला लागले. त्यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली. मात्र, त्यानंतर आलेल्या संपर्क नेत्यांना भुजाडे यांचे हे काम पसंत पडले नव्हते. त्यामुळे काही दिवसांमध्येच नेत्यांमध्ये सातत्याने धुसफूस सुरू झाली.

त्यावेळी अचानक भुजाडे यांच्या पदावर नवी नियुक्ती करण्यात आल्यावर मतदारसंघातील पदाधिकारी संतापले. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आणि भुजाडे यांच्यासह जवळपास 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांना संयमाचे आवाहन करत लवकरच वाद मिटवण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासन देऊनही बरेच दिवस उलटले तरीही यात कोणतीही मध्यस्थी करण्यात आली नाही.

त्यामुळे पदाधिकारी नाराज झाले. त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर चांदवडमध्ये आज बुधवारी तालुका विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. या मतदारसंघातून विकास आघाडीचाच उमेदवार उभा करणार असल्याचं विकास भुजाड यांनी सांगितलं. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून डॉ. राहुल आहेर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात विकास आघाडी उमेदवार देणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT