महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. तसंच तिसरी आघाडीही स्थापन झाली आहे. अशात बिगर मराठा मतं महायुतीला एकगठ्ठा मिळतील का? यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे महायुतीचं आणि विशेष म्हणजे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हटले आहेत अजित पवार ते पाहूयात
राज्यात जातीच्या आधारे मतदान होत नाही
ओबीसींची एकगठ्ठा मतं मिळणं कठीणच
गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, फरांदेंसारख्या ओबीसी नेत्यांमुळे
वंजारी समाज एकगठ्ठा भाजपच्या मागे उभा राहिला.
आता तेवढ्या प्रमाणात घडेल असं वाटत नाही.
मुळात लोकसभेला भाजपला कायम पूरक ठरलेले 'माधवं' समीकरण यश मिळवून देऊ शकले नाही. माळी, धनगर आणि वंजारी हे समाज ओबीसीमध्येत. ओबीसी समाज हा भाजपचा मुख्य आधार आहे. आतापर्यंत मराठा समाज विभागलेला होता. त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होत असे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि मराठा समाज एकवटला.
एकवटलेल्या मराठा समाजासह दलित, मुस्लिम मतदारही महाविकास आघाडीच्या मागे गेले. मात्र मराठा आणि ओबीसींमधल्या संघर्षामुळे ओबीसी भाजपकडे वळतील असा कयास बांधला जातोय. मात्र अजित पवारांच्या दाव्यामुळे भाजपचं आणि विशेषता महायुतीचं मतांचं समीकरण बिघडणार की एकगठ्ठा मतं महायुतीला मिळणार हे निकालातच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.