Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: महिलांच्या बँक खात्यात दरमहिना ₹ ३०००; राहुल गांधींची भाषणातून 'खटाखट-खटाखट' आश्वासने

Rahul Gandhi : मुंबईतील बीकेसी मैदनात मविआची प्रचार सभा होत आहे.

Bharat Jadhav

ज्या जखमा, महागाईचा मार, भाजप सरकारने दिला आहे, सगळ्यात जास्त वेदना महाराष्ट्राच्या महिलांना होतोय. यामुळे त्यांच्या बँक खात्यात दरमहिना ३ हजार आणि बस प्रवास मोफत संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला बसमधून प्रवास करतील त्यांना बस तिकीटासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही.

आज मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या मविआच्या प्रचार सभेत बोलातांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी पंचसुत्री जाहीर केली. मविआचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना लागू केली जाईल अशी घोषणा राहुल गांधी केली. यात महिला आणि मुलींना मोफत बस प्रवासचा लाभ घेता येणार आहे. शिवाय त्यांच्या बँक खात्यात दरमहिन्याला ३००० रुपये पाठवले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पंचसुत्रीमधील योजनेचा माहिती देताना राहुल गांधी म्हणाले, मी नागपूरमध्ये संविधानाचं बोललो, ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे अब्जाधीशांचं सरकार, दुसरीकडे युवकांची, लहान दुकानदार, उद्योजकांचं सरकार म्हणून इंडिया आघाडीनं महाराष्ट्रात पाच गॅरंटी दिली आहे. आपण महालक्ष्मी योजनेची माहिती तुम्हाला देणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. तीन हजार दरमहिना प्रत्येक महिलेच्या बँकेत हे सरकार टाकणार आहे. ही रक्कम बँक खात्यात महाराष्ट्रातील महिलांना खटाखट खटाखट टाकणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT