Dhule Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Dhule Assembly Election: धुळे शहर विधानसभा मतदार संघात मात्र मविआत मोठा गोंधळ निर्माण झालाय. खरा उमेदवार कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांसह मतदारांना पडलाय. समाजवादी पक्ष आणि ठाकरे गटात उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय.

Bharat Jadhav

एकाबाजुला उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात असतानाच धुळ्यात मविआतील वाद चव्हाट्यावर आलाय. धुळे शहर विधानसभा जागेवरून समाजवादी पक्ष आणि ठाकरे गटात उमेदवारीवरुन पेच निर्माण झालाय. मविआतील दिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिल्या याद्या जाहीर केल्या. मात्र काही मतदार संघात उमेदवारीवरून पेच मिटलेला नाहीये.

धुळे शहर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या समाजवादी पार्टी व ठाकरे गट शिवसेनेत उमेदवारीवरून पेच कायम आहे. समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जाहीरदार यांच्याकडे देखील पक्षाचा एबी फॉर्म असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांच्याकडे देखील ठाकरे गटातर्फे एबी फॉर्म आहे. यामुळे धुळ्यात मविआचा नक्की कोणता उमेदवार आहे याबबत संभ्रम निर्माण झालाय.

माजी आमदार अनिल गोटे यांना ठाकरे गट शिवसेनेतर्फे दिलेला एबी फॉर्म शेवटच्या घटकाला थांबविण्यात येईल. तसेच महाविकास आघाडी तर्फे समाजवादी पक्षाला उमेदवारी दिली जाईल असा विश्वास समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांना व्यक्त केलाय. तर स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपण उमेदवारी करावी अशी असलेली इच्छा पूर्ण करून आपल्या उमेदवारीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू असं गोटे उमेदवारी मिळाल्यानंतर म्हणालेत. त्यामुळे खरा उमेदवार कोण गोटे की जहागीरदार असा प्रश्न मतदारांसह कार्यकर्त्यांना पडलाय.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय. ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची नावे जाहीर केली. तर काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्याचबरोबर अनेकांना एबी फॉर्म देखील देण्यात आले.

 ठाकरेंच्या शिलेदाराने पवारांविरोधात दंड थोपाटले

शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली पहिली उमदेवारी यादी जाहीर केली. पण त्यानंतर बंडखोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुण्यात मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने ठाकरेंच्या शिलेदाराने बंडाची पवित्रा घेतला आहे. पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज आहेत. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज मेळावा घेत अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT