Maharashtra Assembly Election 2024 : अंबरनाथमध्ये मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना मदत करणार, असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नाही आणि साहेबांचे अद्याप काहीही स्पष्ट आदेश नाहीत. पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं ते पक्ष म्हणून ठरवू, असे राजू पाटील म्हणाले, तर मनसैनिक माझे मित्र असून ते मदत करतील ही खात्री नव्हे तर गॅरंटी, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमदेवार राजेश वानखेडे यांनी दिली.
अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केली आहे. अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नसून अजून साहेबांचे काहीही स्पष्ट आदेश आम्हाला आलेले नाहीत. राजेश वानखेडे माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार. पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं ते आम्ही पक्ष म्हणून पण ठरवू, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.
याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता, मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अंबरनाथमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला शुक्रवारी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहिले. याचवेळी अंबरनाथमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली, तसंच या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली. या भेटीमुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.