Palghar saam tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll : पालघरमधून राजेंद्र गावित होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Palghar Vidhan Sabha Constituency : पालघर मतदारसंघात शिंदे गटाचे पारडं जड दिसतंय. पालघरमध्ये शिंदे गटाकडून राजेंद्र गावित हे उमेदवार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

Palghar Vidhan Sabha Election: बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. आता शनिवारी म्हणजेच २३ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोणता उमेदवार निवडून येणार, कोण पडणार? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

पालघर मतदारसंघात शिंदे गटाचे पारडं जड दिसतंय. पालघरमध्ये शिंदे गटाकडून राजेंद्र गावित हे उमेदवार आहेत. तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळे हे उमेदवार आहेत. मात्र हाती आलेल्या आकड्यांनुसार पालघरची जनता राजेंद्र गावित यांना निवडून देऊ शकते. त्यामुळे संभाव्य आमदार म्हणून गावित यांचं नाव पुढे येतंय. (Maharashtra Election Exit Poll Result)

पालघरमध्ये मनसे पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूकीसाठी उतरली आहे. मात्र तीही याठिकाणी सेने विरूद्ध सेना अशीच लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. गावित यांचा राजकीय अनुभव आणि त्यांचे थेट राजकीय संबंध यांच्यामुळे त्यांचं पारडं या ठिकाणी जड दिसून येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT