Khamgaon saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll : खामगावमधून प्रकाश फुंडकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll, Khamgaon Constituency: खामगाव मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसून येतंय. याठिकाणी भाजपचे प्रकाश फुंडकर उमेदवार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

Khamgaon Assembly Election 2024: बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून २३ तारखेला म्हणजेच परवा मतमोजणी करण्यात येणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोणता उमेदवार निवडून येणार, कोण पडणार? असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला आहे. यावेळी कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते पाहूयात.

खामगाव मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसून येतंय. याठिकाणी भाजपचे प्रकाश फुंडकर उमेदवार आहेत. त्यांना काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांचं आव्हान आहे. मुळात खामगाव हा १५ वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र २०१४ मध्ये सगळी समीकरणं बदलली भाजपाने यामध्ये बाजी मारली.

आता तिसर्‍या वेळी देखील भाजपचे उमेदवार फुंडकर यांचं पारडं जड दिसून येतंय. यावेळी इतिहासात पहिल्यांदाच खामगावमध्ये ७६ टक्के मतदान झालं. यावेळी मतदारांचा कल काहीसा फुंडकर यांच्याकडे दिसून आला आहे. त्यामुळे फुंडकर यांची विजयाची हॅटट्रिक होऊ शकते, असं एक्झिट पोलमधून दिसून येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

SCROLL FOR NEXT