Shahada Constituency 
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll: भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhor Vidhansabha Election Exit Poll Result: भोर मतदारसंघामध्ये संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या राज्यात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. भोर मतदारसंघातून काँग्रेसचं पारडं जड दिसतंय. त्यांमुळे याठिकाणी संग्राम थोपटे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे.

भोर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून संग्राम थोपटे निवडणूक लढत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शंकर मांडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, संग्राम थोपटे हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर शंकर मांडेकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा मतदारसंघापैकी एक अतिशय महत्त्वाचं मतदारसंघ म्हणून भोर मतदारसंघाची ओळख आहे आणि याच मतदारसंघात थोपटे कुटुंबाचं मोठं वलय या संपूर्ण मतदारसंघाला प्राप्त झालं आहे. १९७२ ते २०२४ म्हणजे संपूर्ण ५२ वर्ष आणि त्यातलेच ४५ वर्ष याच मतदारसंघावर प्रभुत्व आणि अधिकार ज्यांनी गाजवला आहे तेच म्हणजे थोपटे परिवार. थोपटे परिवाराच्या विरोधात कुठल उमेदवार जिंकून येऊ शकतो का त्यांच्यात खरी ताकद आहे का असे अनेक वेळा चर्चेत आलं होतं. आधी आनंदराव थोपटे मग संग्राम थोपटे हे दोघेही पिता-पुत्र आमदार जे आहेत ते जवळपास गेल्या ४५ वर्षांपासून हा सगळा टप्पा जो आहे तो याच भोर मतदारसंघातून त्यांनी केलेला आहे.

तीन टर्मपासून संग्राम थोपटे हे भोरमधले आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शंकर मांडेकर खरंतर महाविकास आगाडीकडून उमेदवारी मागत होते पण त्यांना उमेदवारी न मिळल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार देखील महाविकास आघाडीचा हा एक्का म्हणून संग्राम थोपटेंच्या विरोधात वापरण्याचं ठरवलं. अनेक वाहतूक कोंडीचे ममुद्दे असतील, हायवेचे मुद्दे असतील किंवा पाण्याचे मुद्दे असतील, विकासाचे मुद्दे असतील ते या भोर विधानसभा मतदारसंघावर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Kitchen Hacks : घरातील बाल्कनीत लिंबूचे झाड लावायचे असेल, तर या टिप्स नक्कीच वाचा

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT