Maharashtra assembly election 2024  Canva
Maharashtra Assembly Elections

Nashik West Constituency : भाजपच्या बालेकिल्ला महाविकास आघाडी भेदणार का? नाशिक पश्चिममध्ये कोण सरस ठरणार?

Maharashtra assembly election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता काही राजकीय पक्षातील नेत्यांनी मतदारसंघावरून हेवेदावे देखील सुरू केले आहे. नाशिक पश्चिममध्येही अशीच परिस्थिती दिसत आहे.

Vishal Gangurde

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने महायुतीच्या उमेदवाराला धूळ चारली. लोकसभेतील चांगल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. नाशिक शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारासंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोण सरस ठरणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

२०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सीमा हिरे यांनी ७८,०४१ मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांचा पराभव केला. तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांचा पराभव केला होता.

महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी?

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी सुधाकर बडगुजर इच्छुक आहेत. या मतदारसंघातून बडगुजर निवडणूक लढतील, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्याने काँग्रेस आणि शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाशिक पश्चिमची जागा कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणारी?

नाशिक पश्चिम विधानसभा मतदासंघात भाजप नेत्यांमध्येच उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात २ टर्म आमदार असलेल्या सीमा हिरे यांना पक्षातूनच वाढती स्पर्धा आहे. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनीही नाशिक पश्चिम विधानसभा मदारसंघावर दावा केला आहे. पेशकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तर लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांच्या सूचनेनंतर माघार घेतलेले दिनकर पाटील यांनीही नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावा केला आहे. पक्षाकडून नाशिक पश्चिममधून मलाच उमेदवारी मिळेल, दिनकर पाटील यांचा दावा आहे. दिनकर पाटील यांनीही तिकीट मिळण्याआधीच मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केसी आहे. एकीकडे जागा वाटपावरून महायुतीमध्येचं रस्सीखेच असताना नाशिक पश्चिममध्ये मात्र भाजपमध्येचं तिकिटासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT