Police Transfer List : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, ठाणे, लातूरसह नांदेडमध्ये बदल!

Police Officer Transfer List : राज्यात येत्या दोन तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत.
Police Transfer
Pune Police Officers Transferred:saam Tv
Published On

Maharashtra Police Officer Transfer List : विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Vidhan Sabha Election) अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. पण त्याआधीच राज्यात बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या (Police Officer Transfer) बदल्या झाल्या आहेत. राज्यातील राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाकडून बुधवारी संध्याकाळी यासंदर्भात आदेश काढण्यात आलेत.

Police Transfer
Pune News : नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत, पुण्यातील तरुणानं टोकाचं पाऊल उचललं, आयुष्य संपवलं!

कुणाची कुठे झाली बदली ? Police Transfer List

  1. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त विजय मगर यांची लातूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

  2. गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

  3. ठाणे शहर, वाहतूक, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) येथे बदली झाली.

  4. अमरावती, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे.

  5. नांदेड, अपर पोलीस अधीक्षक नांदेड येथे कार्यरत असणारे अबिनाश कुमार यांची बदली नांदेड येथे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे.

  6. पणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांची बदली बृहन्मुंबई येथे पोलीस उप आयुक्त म्हणून झाली आहे.

  7. ठाण्यातील महामार्ग सुरक्षा पथक पोलीस अधीक्षक मोहन एम. दहिकर यांची बदली ठाण्यातच पोलीस अप आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

  8. प्रकाश बी जाधव यांची बदली सहायक पोलीस महानिरीक्षक नियोजन व समनव्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे. ते आधी बृहन्मुंबई येथे पोलीस उप आयुक्त येथे कार्यरत होते.

  9. राजकुमार शिंदे यांची बदली पुणे शहर पोलीस उफ आयुक्त म्हणून करण्यात आली. ते आधी नांदेड येथे कार्यरत होते.

  10. गोरख सुरेश भामरे यांची बदली गोंदिया पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. ते आधी नागपूर शहर येथे पोलीस उफ आयुक्त म्हणून कार्यरत होते.

  11. प्रियंका नारनवरे यांची बदली नागपूरमध्ये पोलीस अधीक्षक लोहमार्ग येथे झाली आहे.

  12. निखिल पिंगळे यांची बदली पुणे शहर पोलीस उप आयुक्त म्हणून झाली आहे. ते आधी गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

Police Transfer
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

तसेच, (१) श्री. मनिष कलवानिया, भा.पो.से. (२) श्री. श्रीकृष्ण कोकाटे, भा.पो.से. आणि (३) श्री. नंदकुमार ठाकूर, भा.पो.से. यांची महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, याद्वारे, बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी. हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील परंतुकानुसार, सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com