मावळ विधानसभा मतदारसंघाला निसर्गाने भरभरून दिलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेलं हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्याचा समावेश आहे. तर पिंपरी आणि मावळची तहान भागवणारे पवना धरणही याच मावळ मतदारसंघात आहे. आगरी कोळी आणि ठाकरे कुटुंबियांचं आराध्य दैवत असलेले एकविरा देवी देखील याच मतदारसंघात आहे. मावळ मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे आमदार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो.
मावळ विधानसभा मतदारसंघात 1967 ते 2017 पर्यंतच्या काळात विविध पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यात व सहा वेळा आमदार होण्याचा वेगवेगळ्या कुटुंबीयांना मान मिळालेला आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीत सुनील शेळके विरुद्ध माजी मंत्री बाळा भेगडे अशी लढत झाली या निवडणुकीत माजी मंत्री बाळा भेगडे यांना पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके घड्याळ चिन्हावर विजयी झाले. मावळ मतदार संघ हा 1952 साली अस्तित्वात आला. आमदार होण्याचा पहिला मान सरदार वीरधवन दाभाडे यांना मिळाला. त्यानंतर 1957 ला रामभाऊ म्हाळगी, 1962 ला मामासाहेब मोहोळ, 1962 ला रघुनाथ सातकर, 1972 ला कृष्णरावजी भेगडे, 1977 गाडे पाटील, 1980 मदन बाफना, 1985 मदन बाफना, 1990 मदन बाफना, 1995 रूपरेखा ढोरे, 1999 दिगंबर भेगडे, 2004 दिगंबर भेगडे, 2009 बाळा भेगडे आणि 2014 बाळा भेगडे हे आमदार झाले.
गेल्या ५० वर्षांचा इतिहास बघता मावळ तालुक्यात भेगडे यांचे वर्चस्व राहिले आहे. कोणत्याही पक्षातील एकही जण सलग तीन वेळा आमदार झाला नाही. बाळा भेगडे यांना दहा वर्षे पूर्ण झाली असताना त्यांची मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. भेगडे घराण्यात मंत्री होण्याचा पहिला मान बाळा भेगडे यांना मिळाला. मात्र त्यांची हॅट्रिक हुकली. गेल्या निवडणुकीत बाळा भेगडे विजय होतील अशी आशा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे विजयी झाले. राज्याच्या राजकारणात सद्या वेगळे चित्र असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ कुणीही युतीचा धर्म पाळतील असे आजच्या राजकीय परिस्थितीतून वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे अशी लढत होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांचा पराभव केला. सुनील शेळके 1,67,712 मतांनी विजयी झाले होते. तर बाळा भेगडे यांना 73,770 मतं मिळाली होती.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानोबा दाभाडे आमने-सामने होते. या निवडणुकीत बाळा भेगडे विजयी झाले होते. त्यांना 95, 319 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या ज्ञानोबा दाभाडे यांचा पराभव झाला होता आणि त्यांना 67,318 मतं मिळाली होती.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आझाम पंसरे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत गजानन बाबर विजयी झाले होते त्यांना 71,196 मतं मिळाली होती. तर गजानन बाबर यांनी आझाम पंसरे यांचा पराभव केला होता. आझाम पंसरे यांना 56,320 मतं मिळाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.