Maharashtra Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Kalyan Politics : ठाकरे गटाला जबरा धक्का, ४० वर्षे काम केलं, ऐन निवडणुकीत कल्याणच्या विजय साळवी यांचा राजीनामा

Maharashtra Assembly Election: निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडालाय. ऐन निवडणुकाचा पारा चढलेला असताना कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळालाय. ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. उपनेत्याने ऐन निवडणुकीच्या काळात राजीनामा दिल्यानं कल्याणमधील राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

आपण घाणेरड्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं म्हणत साळवी यांनी राजीनामा दिलाय. त्यांचा हा राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्याने तसेच सचिन बासरे यांना उमेदवारी देताना विचारात न घेतले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. सचिन बासरे यांना उमेदवारी देताना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना मातोश्री बाहेर जायला सांगितलं होतं.

विधानसभा निवडणूक ऐन रंगात असताना ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे . साळवी यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पत्र व्हायरल केले असून, त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात शिंदे शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर , ठाकरे गटाचे सचिन बासरे मनसेचे उल्हास भोईर निवडणूक रिंगणात आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर यांचे आव्हान असतानाच ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत राजीनामा दिल्याने साळवी यांची समजूत काढण्याचे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकले आहे .याबाबत विजय साळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .

शिवसेनेच्या फुटीनंतर विजय साळवी हे उद्धव ठाकरेसोबत राहिले होते. विजय साळवे हे शिवसेनेत गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत. शाखाप्रमुख ,शहर प्रमूखपासून ते उपनेतापर्यंत त्यांचा प्रवास आहे. 2014 मध्ये विजय साळवी यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र नेते व स्थानिक पदाधिकारी विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करत त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

साळवी यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की, जिल्हाप्रमुख पद काढून घेतले तसेच तसेच सचिन बासरे यांना उमेदवारी देताना देखील त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे की, विनायक राऊत यांनी मातोश्रीबाहेर त्यांना थांबवले आणि सचिन बासरे यांना लपून उमेदवारी दिल्याचा आरोप साळवी यांनी पत्रात केला आहे .विजय साळवी यांनी राजीनामा देताना घाणेरड्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT