Maharashtra Assembly Elections

उबाठाचे पाच आमदार संपर्कात, 2-3 सोडता सर्व आमच्याकडे येणार; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.

Surabhi Jagdish

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. या निवडणूकीत शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.

काय म्हणाले उदय सामंत?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.

कोकणाच्या विकासाबाबत काय म्हणाले सामंत?

महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच कोकणातून दोन भाऊ एकत्र निवडून आले आहेत. किरण सामंत उदय सामंत हे दोन सख्खे भाऊ तर निलेश राणे आणि नितेश राणे हेही दोन सख्खे भाऊ आहेत. उदय सामंत म्हणाले, कोकणचा विकास आम्ही करू याचा आम्हाला विश्वास आहे.

याशिवाय उबाठा जे आमदार निवडून आले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत त्यातीलही काही आमदार आमच्याकडे येतील. याबाबत मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप आता समोरून केला जातोय. जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलोय. गद्दारी कोणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिलं, असंही सामंत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

IPL 2025 Mega Auction Live: 'इंडियन' प्रीमियर लीग! 7 भारतीय खेळाडूंवर लागली 126 कोटींची बोली

Hill Stations:नोव्हेंबर महिन्यात हिल स्टेशनला जायचयं? तर 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Konkan Travel : कोकणचे वैभव असलेल्या 'या' राजवाड्याला कधी भेट दिलीय का?

Sanjay Derkar News : 10 वर्षात मतदारसंघात काम झालं नाही; ठाकरेंचे नवनिर्वाचित आमदार देरकर यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT