Sachin Tendulkar right to vote saam tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: सगळ्यांनी या, मतदान करा...! सचिन तेंडुलकरने पत्नी, मुलीसह बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांनाही केलं आवाहन

Assembly Election: सेलिब्रिटी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईच्या वांद्रे इथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्याने मत दिलं आहे.

Surabhi Jagdish

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झालीये. यावेळी सेलिब्रिटी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईच्या वांद्रे इथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्याने मत दिलं आहे.

काय म्हणला सचिन तेंडुलकर?

सचिन तेंडुलकर याने त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला की, आजच्या दिवशी सगळ्यांनी या आणि मतदान करा. निवडणूक आयोगाचा मी ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मी गेल्या वर्षभरापासून मतदान करण्यासाठी आवाहन करतोय. आज देखील मी तेच करेन. यठिकाणी चांगल्या सोयी सुविधा चांगल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी येऊन आवर्जून मतदान करावं.

माझी आशा आहे की, सर्व जण पुढे येतील आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील, असं सचिनने म्हटलं आहे.

जनतेला आला होता थेट सचिनचा फोन

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोन महाराष्ट्रातील जनतेला येत होता. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा भारतीय निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड केलेला कॉल जनतेला आला होता.

ऑगस्ट २०२३ मध्ये सचिनची भारतीय निवडणूक आयोगाने मतदान जागृकता आणि शिक्षण यासाठी नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर तो मतदानाबाबत जनजागृती करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024 : दुसऱ्याच उमेदवाराला जातेय मत; इगतपुरीच्या तळेगाव येथे गोंधळ, मतदान प्रक्रिया थांबविली

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: शरद पवार निघाले मुंबईच्या दिशेने रवाना...

Gold Price Today: निवडणूकीच्या धामधूमीत सोन्याचं महागाईला मत; पाहा काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Baramati Politics: ४ वेळा उपमुख्यमंत्री येऊनही अजित पवारांवर कसला अन्याय झाला?, शरद पवार यांचा सवाल

Pravin Vitthal Tarde: 'एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री....' प्रवीण तरडेंनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

SCROLL FOR NEXT