Hitendra Thakur targets BJP saam tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: विरोधकांनी आमीष दाखवलं तरी जनता आमच्यासोबतच; मतदानानंतर हितेंद्र ठाकूर यांचा भाजपवर निशाणा

Assembly Election: आज मतदानाचा दिवस असून वसई-विरार परिसरातील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे.

Surabhi Jagdish

मतदानापूर्वीचा दिवस राजकीय वर्तुळात फारच गाजला. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत पैसे वाटत होते, असा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला गेला. दरम्यान आज मतदानाचा दिवस असून वसई-विरार परिसरातील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे.

वसई विरार परिसरातील आमदार हितेंद्र ठाकूरसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. त्यांनी विरार पश्चिमेच्या जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान काल विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. भाजप कडून पैसे वाटप करण्यात आले होते, असा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

काय म्हणाले आमदार हितेंद्र ठाकूर?

या प्रकरणानंतर मतदानाच्या दिवशी हितेंद्र ठाकूर म्हणाले की, या निवडणूकीमध्ये आमचा विजय निच्छित आहे. मुळात लोकांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत आहे. विरोधी पक्षाने कितीही अमिष दाखवलं तरीही जनता बहुजन विकास आघाडी सोबत आहे, असं म्हणत ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काय आहे नेमकं प्रकरणं?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. विनोद तावडेंना विरारमधील विवांता हॉटेलमध्ये घेराव घालण्यात होता. बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

यावेळी विनोद तावडे यांच्याकडे ५ कोटी रुपये असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. दरम्यान भाजपचे नेते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होताच विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत जाब विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: यांचा खरा चेहरा समोर आला...सुजय विखेंचा नाव न घेता बाळासाहेब थोरांतावर आरोप

Kedar Dighe: ठाण्यात दारू आणि पैशांच्या पाकीटाचे वाटप, केदार दिघेसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

VIDEO : शिर्डीमध्ये पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल | Marathi News

Parli Rada : ऐन थंडीमध्ये परळीत भडका, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला, शरद पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Ajit Pawar News : शर्मिला पवारांचे आरोप धांतात खोटे, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण | Marathi News

SCROLL FOR NEXT