Mumbai Crime News Mumbai Crime News
Maharashtra Assembly Elections

Mumbai News : मुंबईतून 9 कोटींचे डॉलर्स जप्त, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Mumbai Crime News : निवडणूक आयोगाच्या पथकाने कैवल्यधाम परिसरात विविध देशांचे सुमारे १० लाख डॉलर वाहून नेणारे वाहन पकडले.

Namdeo Kumbhar

Election Commission Of india : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या कुलाबा मतदारसंघात कैवल्यधाम परिसरात निवडणूक आयोगाच्या पथकाने विविध देशांचे सुमारे १० लाख डॉलर वाहून नेणारे वाहन पकडले. या डॉलरची भारतीय चलनानुसार नऊ कोटी रुपये किंमत आहे.

प्राथमिक तपासात ते पैसे बँकेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले असून पुढील तपासासाठी कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारास कैवल्य धाम परिसरातून लॉजिस्टिक कंपनीच्या वाहनाला अडवून केलेल्या तपासणीत पथकाला डॉलर्स मिळून आले.

ही रोकड विमानतळावरून बँकेकडे वाहून नेली जात होती. या व्यवहारासाठी कस्टम विभागाची परवानगी आवश्यक असते. त्या परवानगीबाबतची कागदपत्रेही कर्मचाऱ्यांनी दाखवली. मात्र खातरजमा करण्यासाठी वाहन आणि त्यातील डॉलर कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानुसार कस्टम विभाग मार्गत अधिक तपास केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Temple: गुफेत आहे शिव मंदिर, महाराष्ट्रातील केदारनाथ तुम्ही पाहिलंय का?

IPL 2025 Mega Auction: धोनीचा खास भिडू मुंबईच्या ताफ्यात! या ३ गोलंदाजांवर लागली मोठी बोली

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथविधी घेणार?

IPL Mega Auction 2025 Live News: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या अंशुल कंबोजवर ३.४० कोटींची बोली

Maharashtra Politics : मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी होणार? नवी तारीख आणि नवी माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT