CM Eknath Shinde  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना हेच शिकवता? गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंचा पारा चढला, थेट कार्यलात जाब विचारला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Eknath Shinde VIDEO : एकनाथ शिंदे यांना प्रचारावेळी गद्दार गद्दार म्हटले गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी काँग्रेस कार्यालयात जाऊन जाब विचारला. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय.

Namdeo Kumbhar

Shiv Sena vs Shiv Sena, Maharashtra Assembly elections 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचारसभेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष टोकाला गेलाय. याचाच प्रत्यय मुंबईच्या चांदिवली परिसरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते. त्यांनी काँग्रेस कार्यलयात जाऊन जाब विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्याचं जिव्हारी लागलं. त्यांनी गाडी थांबवून थेट काँग्रेस कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांना हेच शिकवता का? असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यलायतील कार्यकर्त्यांना आणि शाखा प्रमुखाला विचारला. एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झालाय. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या संतोष नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आलेय. एकनाथ शिंदे यांनी त्या व्यक्तीवर कारवाई करा, असेही पोलिसांना सांगितल्याचे समोर आलेय.

गद्दार गद्दारच्या घोषणा -

चांदिवलीमधून सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला.

एकनाथ शिंदेंचा पारा चढला? नेमकं काय झालं?

गद्दार गद्दार घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकल्या आणि त्यांचा पारा चढला. संतापलेल्या शिंदेंनी गाडी बाजूला करतथेट काँग्रेस कार्यालयात जाऊन जाब विचारला. एकनाथ शिंदे अचानक कार्यालयात आल्यामुळे त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांना हेच शिकवता का असा सवाल शिंदेंनी केला. यामुळे प्रकारानंतर पोलिसांनी संतोष कटके यांना ताब्यात घेतले आणि दंड भरायला लावला. संतोष कटके यानं शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय गद्दार गद्दार घोषणाबाजीही केली होती.

ठाकरेंकडून सत्कार अन् कौतुक

या घटनेनंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताफा अडवणाऱ्या संतोष कटके तरुणाला मातोश्रीवर बोलावून त्याचं कौतुक केलं. कटके पिता पुत्रांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संतोष कटके याचे वडील साधू कटके हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. आता ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT