Assembly Election Rediff mail
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: महायुतीला 175 जागा मिळणार; अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा दावा

Assembly Election: राज्यात निकालाआधीच सर्व्हेनं पुन्हा गदारोळ केलाय. मतदानानंतर युती आघाडीला किती जागा येणार याचा अंदाज या सर्व्हेत समोर आल्यानं राजकीय नेत्यांचे दावे प्रतिदावे सुरु झाले. यावेळी सर्व्हेतून भ्रम पसरत असल्याचा आरोप कऱण्यात आल्यानं सर्व्हेचे आकडे खरंच सत्यात उतरतात की राजकीय पक्षांचा केवळ उत्साह वाढवतात पाहूया, या रिपोर्टमध्ये..

Bharat Jadhav

राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना आता कुणाची सत्ता येणार याचे सर्व्हे सुरू झाले आहेत. काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेत महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही महायुतीलाच यश मिळणार असून तब्बल पावणे दोनशे जागा मिळतील असा दावा केलाय.

याला दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा देत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. महायुतीच्या नेत्यांचा दावा मविआनं फेटाळलाय. एवढंच नव्हे तर महायुती केवळ भ्रम निर्माण करण्यासाठी सर्व्हे करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.

राज्यात पुन्हा एकदा सर्व्हेवरुन महायुती आणि मविआमध्ये जुंपलीये. भाजप सर्व्हेमधून भ्रम पसरवते असा आरोप करत संजय राऊतांनी सर्व्हेवरुन जोरदार टिका केलीये. यावेळी बोलतांना संजय राऊतांनी महायुतीला 160 ते 165 जागा मिळतील असा दावा केलाय. तर सर्व्हेवरुन संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांनी महायुतीचं टार्गेटच जाहीर केलंय.

लोकसभा निवडणूकीत सगळे सर्व्हे निकामी ठरले होते. सत्ताधारी पक्षाला ४०० पार जागा मिळतील असं सर्व्हे सांगत असत असतांना जनतेनं सगळे सर्व्हेचे आकडे मतदानातून फिरवल्याचं दिसलं आणि म्हणूनच लोकसभेतला निकाल पाहून देवेंद्र फडणवीसांनी संयमी प्रतिक्रीया दिलीये.

निकालाआधीच ज्या सर्व्हेच्या आकड्यावरुन गदारोळ सुरु झालाय. ते सर्व्हेचे आकडे काय सांगतायेत पाहूया.

महायुतीला 145 ते 165 जागांचा अंदाज

मविआला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज.

आजवर मतदानाआधी आलेल्या सर्व्हेनं अनेकदा जनतेला संभ्रमात टाकणारे आकडे समोर आणले. परंतू खरा मतदार राजा कोणाला किती जागा देतो हे येत्या २३ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

Zarine Khan Funeral : जरीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईला अखेरचा निरोप देताना लेक ढसाढसा रडला, पाहा VIDEO

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

SCROLL FOR NEXT