BJP vs Shiv sena 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: मुख्यमंत्रिपद म्हणजे छातीवर दगड; शिंदे गटानंही दाखवला भाजपला त्यागाचा हिशोब

Girish Nikam

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रिपदाची आठवण करून देत कमी जागांवर बोळवण करण्यासाठी हे ऐनवेळचं दबावतंत्र शाहांनी आखल्याची चर्चा रंगलीय. याला बावनकुळेंनी दुजोरा दिल्यामुळे शिंदे गटात कमालीचा संताप पसरलाय. शिंदे गटानं भाजपला त्यागाचा हिशोबच दाखवलाय. महायुतीतल्या त्यागावरील राजकीय नाट्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. मात्र महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेलाही महायुतीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरुन वाद होता. तेच चित्र आता विधानसभेलाही दिसतंय. त्यापार्श्वभूमीवर अमित शाहांनी छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद आणि भाजप नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिलीय.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी देखील भाजप मोठा पक्ष असून जास्त जागा मिळाव्यात, शिंदेंनी मन मोठं करुन त्याग करावा, असं वक्तव्य केल्यामुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळालंय. मात्र यामुळे शिंदे गट चांगलाच संपातला असून शिंदे गटानंही आपल्या त्यागाचा हिशोब भाजपला दाखवलाय. अमित शाह एकनाथ शिंदेंना नेमकं काय म्हणाले? पाहूयात.

देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, तहसीलदार ही तीनच महत्त्वाची पदं

बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था

ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं

तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला.

यामुळे मात्र विरोधकांना भाजप आणि शिंदेंना टार्गेट करण्याची आयती संधी मिळाली. त्याग वगैरे नव्हे तर शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्रावर उगवण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर या सर्व चर्चा फडणवीसांनी फेटाळून लावल्या आहेत.

महायुती शिदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवत असली तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नसल्याचं भाजपने आधीच स्पष्ट केलंय.. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदेंनी आपलं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करण्याची मागणी अमित शाहांकडे केली होती. मात्र शाहांनी शिंदेंची मागणी धुडकावून लावल्यानं आता शिंदेंना कमी जागांवर तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे., त्यामुळे आता मोठा भाऊ मित्रपक्षांना किती सन्मान देणार हे लवकरच कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra News Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

Sameer Wankhede: समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात? वानखेडेंची राजकारणात एन्ट्री?

SCROLL FOR NEXT