Chandrashekhar Bawankule 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: नाद करा पण आमचा कुठं? शरद पवारांच्या इशाऱ्याला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

Chandrashekhar Bawankule: आम्हाला शरद पवारांचा नाद करायचा नाही अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय.

Tanmay Tillu

सगळ्यांचा नाद करा मात्र माझा नाही असा थेट इशारा शरद पवार यांनी महायुतीला दिला होता.. या लोकांना साधंसुधं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं असं आवाहनही शरद पवारांनी केलं होतं. त्यालाच बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुए.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत. शरद पवारांचा प्रचारसभांचा धडाका सुरुए अशातच माढा विधानसभा मतदारसंघामधील प्रचारसभेत शरद पवारांनी चांगली फटकेबाजी करत महायुतीला इशारा दिलाय. तसंच पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनींही पलटवार केलाय.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत उभी फूट पडली.त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या. या यशानंतर शरद पवारांनी राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. मतांची पेरणी केली. त्यानंतर सातत्यानं विधानसभेच्या अनुषंगानं दौरे केले.

त्यानंतर पवार सातत्यानं आक्रमक भूमिका मांडत भाजपला आणि महायुतीला टार्गेट करतायत. सत्ता बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं आधीच पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पवारांनी महायुतीला दिलेला इशारा महायुतीला आणि विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढवणार का हेच पाहायचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Jalgaon Accident : निवडणूक ड्युटीसाठी जाताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rinku Rajguru: आर्चीला पाहून म्हणाल सैराट झालं जी...

SCROLL FOR NEXT