Chandrashekhar Bawankule Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : भाजपचा तीन विद्यमान आमदारांना धक्का, कुणाचा पत्ता कट होणार?

Maharashtra Vidhan Sabha Election : भाजपची दुसरा यादी कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत भाजपने ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली होती. लवकरच भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण पहिल्या यादीत नाव न आलेल्या तीन विद्यमान आमदारांना भाजप धक्का देण्याची शक्यता आहे. सर्व्हे आणि स्थानिक नेतृत्वाचा कौल घेत भाजप पक्ष श्रेष्ठींनी तीन आमदारांचा पत्ता कट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आमदार विदर्भातील आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आलेल्या विद्यमान आमदारांपैकी पश्चिम विदर्भातील तीन आमदारांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यामध्ये आमदार लखन मलिक, डॉक्टर संदीप दुर्वे आणि हरीश पिंपळे यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुणाला मिळणार संधी? भाजपची काय रणनिती?

एकीकडे तीन विद्यमान आमदारांना धक्का बसण्याची शक्यता आहेच. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवी राठी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. हरीश पिंपळे यांचे तिकीट कापले गेले तर त्या ऐवजी रवी राठी यांचं नाव चर्चेत आहे.

तेच संदीप धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.. त्यांच्या जागेवर माजी आमदार राजू तोडसाम यांना तिकीट मिळणार असल्याचे बोलले जातेय. तोडसाम यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केल्याने नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. वाशिममध्ये लखन मलिक यांचेही तिकीट कापले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली आहे. भाजपमधून शाम खोडे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उमेदवार, प्रवक्ते आणि नेते पदाधिकाऱ्यांना पत्र

Soyabean Price : सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार फायदा

Tulsi Plant: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' ५ टिप्स फॉलो

Maharashtra Politics: शरद पवारांना मी सोडलं नाही.., अजित पवारांचे बारामतीत मोठं विधान

Ahilyanagar News : जम्मू- काश्मीरमधील ९ जण ताब्यात; बनावट बंदूक परवाना घेत करायचे सुरक्षा रक्षकाची नोकरी

SCROLL FOR NEXT