विक्रोळीत पुन्हा एकदा मोठा खजिना गावलाय. आचारसंहितेच्या काळात राज्यभरात पैशांचा पाऊस पडू लागलाय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड जप्त केलंय. मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधीचं घबाड जप्त केलंय.
शनिवारी निवडणूक आयोगाने एक कॅश व्हॅन पकडली होती. आज पुन्हा विक्रोळीत मोठा खजिना निवडणूक आयोगाच्या हाती लागलाय. एका कॅन व्हॅनमध्ये साडेसबा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.
या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी नल्या जात होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आलीय. मात्र निवडणुक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
राज्यात आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावी सुरू असून याकाळात नाकेबंदी दरम्यान अनेक शहरात पैशांचे घबाड जप्त करण्यात आली आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.
राज्यात ७३.११ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. ३७.९८ कोटी रुपयांची दारू ३७.७६ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि ९०.५३ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
पुणे- खेड-शिवापूर टोल नाक्यावरून एका वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त
सातारा- शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त
कसारा घाटात नाशिकहून मुंबईला जाणा-या गाडीत तब्बल 2 कोटींची रोख रक्कम सापडली
पालघर- वाडा येथे 3 कोटी 70 लाखांची रोकड जप्त
पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9 कोटी 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
नालासोपारा, मांडवी आणि मिरा रोड मध्ये 7 कोटी 80 लाखांची रोकड जप्त
विरारमध्ये 2 कोटी रुपयांची रोकड भरारी पथकाने जप्त केली.
पालघरच्या वाडा येथे तीन कोटी सत्तर लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वाडा येथून विक्रमगडकडे जाणारे संशयित वाहन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्या वाहनात करोडोची रोकड असल्याचं उघड झालं. नवी मुंबईतील ऐरोली येथून रोकड घेऊन जाणारं वाहन वाडा , जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोल्हापुरात मोठी कारवाई केलीय. रंकाळा तलाव परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार वाहन पकडली. यात ९ लाख ७८ हजार रुपयांच्या दारूसह १४ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने ही कामगिरी केलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील प्रसाद नराम याला अटक करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.