Daund Election 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: दौंडचं महाभारत ! भाजपच्या कुल यांना रमेश थोरातांचं आव्हान?

Daund Election : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भऱण्यास सुरुवात झालीय. तर दौंडमध्ये राहुल कुल यांना भाजपने रिंगणात उतरवलंय. मात्र राहुल कुल यांना कुणाचं आव्हान असणार आहे? दौंडचं राजकीय समीकरण कसं आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा रणधुमाळी सुरु झालीय. त्यातच दौंड विधानसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. भाजपने विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर माजी आमदार रमेश थोरातांनी भाजपच्या राहुल कुल यांना आव्हान देण्यासाठी पवारांकडे फिल्डिंग लावलीय. मात्र पवारांनी उमेदवारी न दिल्यास थेट अपक्ष लढण्याचा निर्धारही रमेश थोरातांनी केलाय..तर भाजपच्या राहुल कुल यांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

राहुल कुल यांनी दौंडमधून सलग 2 वेळा रमेश थोरातांचा पराभव केलाय.. मात्र 2019 च्या निवडणूकीत राहुल कुल हे काठावर पास झाल्याचं चित्र होते. 2019 मधील चित्र कसं होतं? पाहूयात.

2019 मधील राजकीय गणित?

राहुल कुल, आमदार, भाजप- 1 लाख 3 हजार 664 मतं

रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस- 1 लाख 2 हजार 918 मतं

राहुल कुल 746 मतांनी विजयी

2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना मतफुटीचा फटका बसला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यावेळी रमेश थोरातांनी पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने रमेश थोरातांनी पुन्हा पवारांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केलेत. मात्र फक्त थोरातच नाही तर दौंडमधून लढण्यासाठी इच्छुकांची रांगच लागलीय.

दौंडमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी?

राहुल कुल,आमदार, भाजप

रमेश थोरात, इच्छुक, राष्ट्रवादी(SP)/ अपक्ष

आप्पासाहेब पवार, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)

नामदेव ताकवणे, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)

लोकसभेला दौंडमधून सुप्रिया सुळेंना तब्बल 26 हजार मतांचं लीड मिळालं. त्यामुळे राहुल कुल यांचं टेंशन वाढलंय. मात्र पवार थोरातांना उमेदवारी देणार की नवा पत्ता टाकणार? यावर कुल यांची हॅट्रिक होणार की नाही? याचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT