BJP On Maharashtra Assembly Election  SAAM TV
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: भाजप आमदारांची धकधक वाढणार; पक्षश्रेष्ठी काही आमदारांचे कापणार तिकीट

Maharashtra Assembly Election: भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी हाती आलीय. कोणत्या आमदारांना तिकीट मिळणार कोणत्या आमदारांना संधी मिळणार याबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झालाय.

Bharat Jadhav

महायुतीतील प्रमुख नेते मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. उद्या दुपारी अडीच वाजता ही परिषद पार पडणार असून महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यात दरम्यान भाजपच्या गोटातून उमेदवारी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. या बातमीमुळे आमदारांच्या हृदयाची धकधक वाढवण्याची शक्यता आहे.

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण त्याचबरोबर भाजप पक्षश्रेष्ठी काही आमदारांचे तिकीट कापणार असल्यची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आमदारांचे काम चांगले नाही त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपच्या आमदारांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे.

जे आमदार पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची धकधक या बातमीमुळे वाढणार आहे. कारण भाजपचे हायकमांड काही आमदारांचं तिकीट कापणार असल्याचं बोललं जात आहे. जे आमदार पराभूत झालेत त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे.

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येणार आहे तर काही आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. खासदारकी लढलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीये. पहिल्या यादीमध्ये मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही वर्तमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

दरम्यान उद्या महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असताना महायुतीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कोणते मोठे निर्णय घेतले जातील. कोणती घोषणा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात झालीय.

याचा मोठा फटका लोकसभेवेळी महायुतीला बसला आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारत राज्यात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू आहेत. मागील काही दिवसांत जागावाटप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT