Maharashtra Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: जागांचा निर्णय होण्याआधीच अबू आझमी यांचं मविआसंदर्भात मोठ विधान

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापलंय. पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. दरम्यान सपा नेते अबू आझमी यांनी जागावाटपावर मोठे वक्तव्य केले आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावलीय. महाविकास आघाडी (एमव्हीए) या प्रमुख पक्षांमधील जागावाटपाचा मुद्दा निकाली निघाला असला तरी हे प्रकरण अजूनही सपासंदर्भात निर्णय झाला नाहीये, त्याचदरम्यान अब्बू आझमी यांनी मोठं विधान केलंय.

मागितलेल्या जागा मविआमध्ये मिळवल्या नाही तर २५ जागांवर उमेदवार देण्याची भाषा करणाऱ्या अबु आझमी यांनी आता मविआत राहण्याबाबत मोठं विधान केलंय. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलंय. मात्र निवडणुकीत सपा महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी एक्स पोस्ट केलीय.

समाजवादी पक्ष, महाविकास आघाडीचा एक भाग आहे. देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिलाय आणि भविष्यातही पाठिंबा देणार आहे. सपाला सध्या महाविकास आघाडीच्या दोन जागा मिळाल्यात. एक जागा मानखुर्द-शिवाजी नगरची तर दुसरी जागा भिवंडी पूर्वेची आहे.

सपा नेत्याने जागावाटपावर दिले मोठे वक्तव्य

समाजवादी पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात इतर जागांसाठी चर्चा सुरू आहे. कुठे सपाची ताकद आहे आणि कुठे लोकांना समाजवादी पक्षाची उमेदवारी हवी आहे या बाबत चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रातील या जागांवर महाविकास आघाडी समाजवादी पक्षाला संधी देईल, अशी आशा अबू आझमी यांना आहे. औरंगाबाद किंवा अन्य ज्या जागांवर सपाचे अधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजवादी पक्षाला ५ जागा मिळाल्या नाहीत तर ते २५ जागांवर उमेदवार उभे करतील. याबाबत त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule: महायुती सरकारला बहिणींना सन्मान देता येत नाही; लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : काँग्रेसच्या चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra Election: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; मिलिंद देवरा देणार आदित्य ठाकरेंना टक्कर, कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT