Maharashtra Assembly Elections

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Assembly Election: पुण्यातील पाच कोटींच्या रोकडवरुन राजकारण तापलंय. या पैशांचं सांगोल्याचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आमदार शहाजी पाटील यांना त्यांचेच फेमस डायलॉग ऐकवत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

अगदी ग्रामंपचायत ते लोकसभेच्या निवडणुकीत कुठे लपूनछपून तर कुठे उघड-उघड पैशांचा वापर होतो. हे वास्तव आहे. राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोचलेला असतानाच पुण्यात पाच कोटींची रोकड सापडल्यानं राजकीय वातावरण तापलंय. खेड-शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या रकमेबाबत पोलीस, निवडणूक विभाग आणि इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याचं पहायला मिळत आहे.

MH 45 - AS 2526 या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या पैशांचं सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ 5 कोटी रुपये दाखवले आणि उरलेले 10 कोटी झाडी डोंगरात पोहोचवले, असा घणाघात राऊतांनी केलाय. कारमधील पैशांशी माझा संबंध नाही, असं शहाजी पाटलांनी स्पष्ट केलंय.

या रोकडवरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. त्या कारमध्ये 5 कोटी नव्हे तर 17 कोटी होते, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर काँग्रेसनेही महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. या गाडीतील व्यक्तींची नावे समोर आली आहेत. सागर सुभाष पाटील - आ. शहाजी पाटील यांचा पुतण्या

रफीक अहमह नजीर - आ. शहाजी पाटील यांचा पीए

बाळासाहेब आसबे - ठेकेदार

शशिकांत कोळी - ड्रायव्हर

खरतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते दीपक साळुंखे ठाकरे गटात गेल्यानं सांगोल्यात राजकीय वातावरण अगोदरच तापलेलं आहे. त्यात पुण्यातील कॅश प्रकरणावरुन शहाजी पाटलांची कोंडी होणार अशी चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT