Modi Photo in EVM:
Modi Photo in EVM: google
लोकसभा २०२४

EVM वर मोदींचा फोटो नाही, तर मत नाही; मतदान केंद्रातला किस्सा समजल्यावर PM मोदींच्या डोळ्यांत पाणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Modi Photo in EVM: लोकसभा निवडणूक २०२४ साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या ८८ जागांसाठी १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी १९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर सुमारे ६५.५ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झाले तर काही ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरावल्याचं दिसून आलं.

दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंमतीदार किस्सा घडलाय. हा किस्सा पंतप्रधान मोदींना माहिती पडला तेव्हा तेही भावूक झालेत. पंतप्रधान मोदींनी या घटनेची पोस्ट सोशल मीडियावरदेखील टाकलीय. या लोकसभेत विजय पक्का करण्यासाठी भाजपने रान पेटवलंय. सर्वत्र प्रचार करताना उमेदवारांच्या नावावर नाही तर थेट पंतप्रधान मोदींच्या नावाने मतदान मागितलं जातंय.

ही घटना राजस्थानमधील सीकर येथील पिपरानी गावातील आहे. येथील मतदान केंद्रात हा विचित्र प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. सीकर मतदारसंघात १९ एप्रिल रोजी ११ वाजता एका शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी खूप गर्दी केली होती. त्यादरम्यान काही महिला गाणे गात-गात मतदान केंद्रात पोहोचल्या. त्यानंतर त्या मतदान केंद्रात एक बाई गोंधळ घालत असल्याचं समोर आलं.

ही महिला मतदान करण्यास नकार देत होती. ईव्हीएमवर पंतप्रधान मोदींचा फोटो दिसला नाही म्हणून आपण मतदान करणार नसल्याचं या महिलेने स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यावेळी मतदान अधिकाऱ्याने सांगितलं की, मशीनवर फक्त पक्षाचं चिन्ह असते. तसे नरेंद्र मोदी उमेदवार नसून दुसरा कोणी व्यक्ती उमेदवार असल्याचं त्या महिलेला सांगिण्यात आलं तेव्हा कुठे त्या महिलेने मतदान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT