will sharad pawar contest lok sabha election 2024? Saam TV
लोकसभा २०२४

Sharad Pawar: पुणे, माढा, सातारा काेणत्या लाेकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार? कार्यकर्त्यांना पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar Latest Marathi News : पुण्यात आज शरद पवार यांच्या भेटीला अन्य पक्षातील, संघटनांमधील नेते, कार्यकर्ते आले हाेते. त्यांची देखील मते पवार यांनी जाणून घेतली.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Maharashtra Election 2024 :

राज्यात एकीकडे मविआच्या (mahavikas aghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar latest marathi news) यांना कार्यकर्ते एक दोन नव्हे तर तब्बल तीन लोकसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (lok sabha election 2024) लढवण्याचा आग्रह करु लागले आहेत. खूद्द शरद पवार यांनीच हि माहिती माध्यमांना अनाैपचारिक गप्पा मारताना दिली. दरम्यान आजवर आपण १४ निवडणुका लढवून जिंकलो असल्याचे सांगत यावेळी मी निवडणुक लढवणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग या निवासस्थानी आज (बुधवार) शरद पवारांनी विविध जिल्ह्यातील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांसमवेत लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला. आज दिवसभर पवार यांच्या भेटीला अन्य पक्षातील, संघटनांमधील नेते, कार्यकर्ते आले हाेते. त्यांची देखील मते पवार यांनी जाणून घेतली. यामध्ये प्रामुख्याने बीडहून ज्याेती मेटे, साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील, माढा येथून अभय देशमुख आदींशी चर्चा केली.

दिवसभराच्या गाठीभेटीनंतर शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या. या गप्पा इतक्या रंगल्या की शरद पवार यांनी स्वत:च निवडणुक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचे सांगून टाकले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले पुणे (pune lok sabha constituency), माढा (madha lok sabha constituency) आणि सातारा (satara lok sabha constituency) या तीन लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुक लढवावी अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. हे सांगत असतानाच मी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय यापूर्वीच जाहिर केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आजवर आपण १४ निवडणुका लढवून जिंकलो असल्याचं ही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT