Uddhav Thackeray On PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: राज्यात ज्यांनी भाजप रुजवली त्या प्रमोद महाजनांची मुलगी पूनम यांना तिकिटी का दिलं नाही? ठाकरेंचा PM मोदींना सवाल

Lok Sabha Election 2024: राज्यात ज्यांनी भाजप रुजवली त्या प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम यांना तिकिटी का दिलं नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा विचारला आहे.

Satish Kengar

Uddhav Thackeray On PM Modi:

राज्यात ज्यांनी भाजप रुजवली त्या प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम यांना तिकिटी का दिलं नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा विचारला आहे. आज महाविकास आघाडीची ठाण्यात सभा पार पडली. मविआचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.

मोदींवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''त्यांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) घराणेशाहीचा तिटकारा आहे, तर ज्या लोकांनी शिवसेना फोडली त्यांच्या मुलाला तिकीट दिलं, ही घराणेशाही तुम्हाला चालत असेल, तर शिवसेनाप्रमुखांची सोडून द्या, ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढावा म्हणून खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला पूनम यांना मुंबईत उमेदवारी का दिलं नाही?''

सभेत बोलताना ठाकरे म्हणाले आहेत की, ''4 जूननंतर मोदी नसतील आज लिहून ठेवा. 4 जूननंतर सरकार राहत नाही, 5 जूनलाच हे फुटतील.'' ते म्हणाले, आज मोदी आणि अमित शाह कंत्राट पद्धतीने देश चालवत आहे. आम्ही हे 4 जूनला तुमचे कंत्राट बंद करत आहोत.''

ठाकरे म्हणाले की, ''मोदीजींनी जेवढा रामाचा जप केला नसेल, तेवढा उद्धव ठाकरेचा जप प्रत्येक सभेत केला आहे.'' ते म्हणाले, ''शिवसेनाप्रमुखांनी स्वतःहून माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी माझ्याकडे दिली. मोदीजी, त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे, शरद पवार यांना सुप्रिया यांना मुख्यमंत्री करायचं, असं ते म्हणतात. मात्र हे आमची माणसं ठरवतील, हे तुम्ही आम्हाला सांगू नका.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT