Ajit Pawar Got Angry Saam Tv
लोकसभा २०२४

Ajit Pawar News: अजित पवारांची सभा सुरू असताना शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी; दादा संतापले, भरसभेत कार्यकर्त्यांना सुनावलं...

Pune News: आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील घोडेगाव येथे सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती उठला आणि त्याने शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Lok Sabha:

>> रोहिदास गाडगे

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील घोडेगाव येथे सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती उठला आणि त्याने शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. यावर अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी व्यासपीठावरून अजित पवार म्हणाले की, ''तुम्हाला कोणीतरी सांगितल्याचं दिसतंय, जाऊन तिथे.. असं बोला, आम्ही काम करायला आलोय गप्पा मारायला नाही.'' अजित पवार असं म्हणाल्या नंतर शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी करणारा व्यक्ती तिथून निघून गेला.

दरम्यान, यासाबेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''अमोल कोल्हे आव्हान देत असतील तर त्यांचे काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे. आव्हान देणाऱ्यांना महत्त्व देत नाही. जो मला आव्हान देतोय, त्याला मीच खासदारकीचे तिकीट देऊन निवडूनही आणलं. मात्र होत ठिक आहे, दिवस बदलत असतात. त्यांना करायचे ते करू द्या.''

ते म्हणाले, ''अमोल कोल्हेंनी जनसंपर्क ठेवला नाही. राजीनामा देणार होते. असा काय चमत्कार घडला, माहित नाही. अभिनेता आहे, अभिनय क्षेत्रातले असल्याने खासदार म्हणून काम करणं अशक्य असल्याची भुमिका कोल्हेंची होती.''

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना अजित पावर म्हणाले की, ''लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे विधान शरद पवारांनी केलं. मात्र हे त्यांचे वैयक्तिक असेल. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी काय विचार करावा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT