Sharad Pawar: राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षापासून हिंडतोय; शरद पवारांचं पीएम मोदींना जशास तसं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचारसभेत बोलतांना शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलंय.
Sharad Pawar In Ahmednagar
Sharad Pawar In Ahmednagar google

अहमदनगर : अहमदनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार पलटवार केला. मोदींना उत्तर देताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचं वर्ष मोजण्याची चुकीसुद्धा काढली. दरम्यान मोदी हे राज्यात प्रचार सभेत बोलताना माझ्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर टीका करतात.कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली, असं शरद पवार म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचारसभेत बोलतांना शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. गेली पन्नास वर्ष एक आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका मोदींनी केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी अहमदनगर येथील सभेत जोरदार पलटवार केला.यावेळी शरद पवारांनी कांदा निर्यातीवर पंतप्रधान मोदींना कोंडीत पकडलं.

या ५६ वर्षात मोदींसारखे कोणताच पंतप्रधान पाहिला नाही.अनेकांसोबत काम केलं पण असं कोणी म्हटलं नाही, असं शरद पवार म्हणालेत. पंतप्रधान मोदींनी कोणत्यातरी आत्माचं चिंता पडावी , राज्यातील सामन्या लोकांच्या मनातून आपल्याला हद्दपार करण्यासाठी मोदी राज्यात सभा घेत आहेत. पण पंतप्रधान मोदींनी काय राज्यातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडवलेत?

सामान्य लोकांची काय अवस्था झालीय?.असे प्रश्न करत शरद पवार यांनी कांदा प्रश्नावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांविषयी कांद्याच्या प्रश्नावर बोलायलाच नको. गुजरातमधील कांद्याच्या निर्यातीला परवानगी आणि महाराष्ट्रातील कांद्याला परवानगी नाही. कांदा निर्याती करण्याचं पीक आहे, त्यातून मिळणारे पैसे हे सामान्य शेतकऱ्यांच्या खात्यात जात असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com