Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar  Saam Tv
लोकसभा २०२४

Vijay Wadettiwar : मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या तक्रारी; विजय वडेट्टीवारांना भलतीच शंका

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर : देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान ८८ जागांवर मतदान होत आहे. राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदानादरम्यान काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या तक्रारीवरून भलतीच शंका व्यक्त केली आहे.

विजय वडेट्टीवारांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, 'ईव्हीएम मशीन बंद कशा पडतात? कारण त्यांची आधी ट्रायल घेतली जाते, यामागे षडयंत्र आहे का? वारंवार मशीन बंद पडतात. त्यानंतर दुपारी सुरू होतात. मतदार केंद्रावर गेल्यानंतर परत माघारी फिरावं लागतं'.

केंद्र सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, 'देशांमध्ये इंडिया आघाडीचे वातावरण निर्माण झाला आहे. केंद्र सरकारविरुद्ध वातावरण तयार आहे. लोक सरकार बदलण्याची वाट बघत आहे. ही संधी आता मतदारांजवळ आहे. संविधानासाठी गरीब शेतकरी बेरोजगार यांना ही सुवर्णसंधी आहे की, आता बदला घेण्याची वेळ आली आहे. आजच्या निवडणुकीतून मतदार बदला घेतील आणि मोदी सरकारलाही फेजमध्ये आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ. जनता या भ्रष्ट जुमलेबाज सरकारचा बदला घेईल, हा विश्वास आम्हाला आहे'.

सांगलीच्या तिढ्यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, 'ज्या जिल्ह्यातील नेता आहे, त्या जिल्ह्यातील नेत्यांनीच निर्णय घ्यायचा असतो. विश्वजीत कदम हे यशस्वीपणे मेहनत करून जिल्हा सांभाळून आहे. युवा नेतृत्व म्हणून त्यांचे काम आहे. म्हणूनच त्यांचं नाव घेतलं आहे. विशाल पाटील नवीन आहे. त्यांना पुढे संधी होती, मात्र त्यांनी घाई केली. ही घाई त्यांना अडचणीची ठरेल. या वयात थांबून पुढे जाण्याचा गरज होती. विशाल पाटील यांनी थांबावं. आघाडीचा धर्म पाळण्यासाठी पुढे यावं'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Tulsi: घरात तुळशीचे रोप असेल तर, या गोष्टीची घ्या काळजी

Pune Accident: सुसाट पोर्शे कार, मद्यधुंद चालक अन् भयंकर अपघात! बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं; तरुण- तरुणी ठार

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT