uttam jankar challenges ajit pawar supports supriya sule in baramati constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

Baramati Constituency: उत्तम जानकरांचे अजित पवारांना खुलं आव्हान, राष्ट्रवादी काय उत्तर देणार?

Baramati Lok Sabha Election: उत्तम जानकर यांनी अजित पवारांनाच खुलं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडेच लक्ष लागले आहे.

भारत नागणे

Uttam Jankar News :

माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी खुद्द राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख अजित पवारांनाच खुलं आव्हान दिले आहे.पक्ष प्रमुख अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करूनच आपण पक्ष सोडणार असं मोठं विधान ही जानकर यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेळापूरच्या सभेत बोलताना जानकरांनी हे विधान केले आहे.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव करूनच पक्ष सोडणार आहे असं मोठं विधान‌ माळशिरसचे उत्तम जानकर यांनी केले आहे. मी माझाच पक्षात राहणार आहे, मी काय पक्ष सोडणार नाही.

बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातून हटणार नाही. आमच्या पक्ष प्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढील निर्णय घेऊ असं ही जानकर म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांनाच खुलं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडेच लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

SCROLL FOR NEXT