Uddhav Thackeray  Saam Digital
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : संविधान बदलण्यासाठीच भाजपला ४०० पार जागांची गरज; शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची मोदी, भाजपवर चौफेर फटकेबाजी

Lok Sabha Election 2024/Bharat Jodo Nyay Yatra : मणिपूरमधून सुरू झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईतील शिवतीर्थावरील भव्य सभेनंतर समारोप झाला. या सभेत इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी भाजवर चौफेर फटकेबाजी केली.

Sandeep Gawade

Uddhav Thackeray

मणिपूरमधून सुरू झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईतील शिवतीर्थावरील भव्य सभेनंतर समारोप झाला. या सभेत इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी भाजवर चौफेर फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांनीही भाजवर जोरदार हल्ला चढवताना, भाजपला मोठं करण्याचं काम शिवसेनेनेचं केलं. मात्र आता त्यांची निती बदलली आहे, असा टोला लगावला. गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितलं होतं, आता लोकशाही संपवण्यासाठी टपलेल्या हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी ‘शिवाजी पार्क’ निवडलेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज नरेंद्र मोदी आणि भाजपला केवश संविधान बदलण्यासाठी ४०० पार जागा हव्या आहेत. आम्ही ‘हुकमशाहीचे‘ विरोधक आहोत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू!. व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे, देशाची ओळख ही एक व्यक्ती होता कामा नये. शिवतीर्थावरून मुंबईतून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं, तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालू लागतो, याची आठवणही त्यांनी करून दिली.

घराणेशाहीवर बोलंल जातं मात्र कुटुंबव्यवस्थेवर बोललं जात नाही; प्रकाश आंबेडकर

पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्रात परिस्थिति वेगळी आहे, त्यामुळे सर्वांनी एखत्र लढलं पाहिजे. ज्या कंपन्याचा प्रॉफिट २०० कोटी आहे त्यांनी १३०० कोटीचे बॉंड कसे दिले. घराणेशाहीवर बोललं जातं मात्र भारताची कुटुंबव्यवस्थेवर बोललं जात नाही. त्यावरही चर्चा झाली पाहिजे. ती हिंदू सस्कृती आहे. त्यावर भाजपवाले बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाला वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये : मेहबुबा मुफ्ती

या देशाने गांधींकडून अनेक मोठे बलिदान घेतलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे. आज आपण वेगवेगळे येथे सगळे एकत्र आलो आहोत. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत, तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे, जनता, मतदारचं देशाची सध्याची स्थिती बदलू शकतात. इंदिरा गांधी यांना तुम्ही मतदानाने सत्तेतून बाहेर काढलं. २०१४ मध्ये तुम्ही मतदान करुन मोदींना मतदान केलं. पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने मोदींनी मत मागितली. आता ४०० पार चा नारा दिलाय कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. चीनमध्ये तुम्ही कोणालाही मतदान दिल तरी एकच व्यक्ती निवडला जातो. तशीच परिस्थिती आज आपल्या देशात आहे. जर तुम्ही जागृकपणे मतदान केलं नाही तर तुम्ही सुद्धा आमच्या सारखे व्हालं, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT