Uddhav Thackarey 
लोकसभा २०२४

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Uddhav Thackarey: महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी आता बोलू लागलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमोल मोटाघरे

मावळ: अदानी आणि अंबानी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने अदानी-अंबानींकडून किती पैसा घेतला? याची माहिती राहुल गांधी द्यावी, असा सवाल करत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस दोन्ही उद्योगपतींवर टीका करत नसल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला टार्गेट केल्यानतंर महाविकास आघाडीमधील मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंनी मोदींना उत्तर देत मोदींनाच सवाल केलाय. ते मावळमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी आता बोलू लागलेत. मोदींची बदलेली भूमिका पाहून अनेकांना एआय बोलत असल्याचा संभ्रम झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. पण खरंच मोदी अदानींविरोधात बोलत होते. पण आता मोदीजी तुम्ही जे अदानी आणि अंबानींना दिलेत, ते आता काढून घेणारं आहात काय? उलट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

पंतप्रधान मोदींकडे कोणत्याच प्रकारचे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते कोणतेही विधाने करत आहेत. राज्यातील जनतेने त्यांना आता अब की बार तडीपार करण्याचं ठरवलंय. जनतेने त्यांना रस्त्यावर आणलं असून मुंबईत त्यांना रोड शो करावे लागत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात काय केलं ते सांगितलं पाहिजे. ज्या शिवसेनेने मोदींना पंतप्रधानपदी बसवलं त्यांनी तिच शिवसेना फोडली. मला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंनी मोदींवर यावेळी केला.

ज्या राज्यातून ४० ते ४३ खासदार दिल्लीत पाठवले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेला मोदींनी संपवण्याचा प्रयत्न केला. आता आमच्याच पक्षाला नकली शिवसेना म्हणत आहात. त्यामुळे हा विश्वासघात फक्त माझा नाही तर अख्या महाराष्ट्राचा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

नोटबंदीवरून घणाघात

मोदींनी टीव्हीवर येत ज्या प्रकारे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कागद होतील असं म्हटलं होतं त्याचप्रमाणे मोदी पण ४ जूननंतर फक्त नरेंद्र मोदी असतील, पंतप्रधान नसणार. कारण पंतप्रधान आमच्या 'इंडिया 'आघाडीचा होईल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसेच ज्याप्रमाणे नोटाबंदी केली त्या प्रमाणे राज्यातील जनता मोदींचं नाणं बंद करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपचा देशातील युवकांना नोकऱ्या देण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचं आवश्वासन देखील यांनी दिलं होतं. परंतु हे आश्वासन पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरलीय. तसेच देशातील युवकांना ४ वर्ष नोकरी अग्निवीरमध्ये कत्रांटी पद्धतीने नोकरी देता आणि स्वत: मात्र सत्तेचे पाच-पाच वाढवून मागता अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.

नोटबंदीवरून मोदींना टीका करताना ठाकरे म्हणाले , नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग होत, असं देशाचे सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश नागरत्न यांनी सांगितलंय. मोदी सरकारने २०१४ साली जे जे काही सांगितलं होतं ते पूर्ण झालेले नाही. ते काय बोलतात त्याचा त्यांना विसर पडतोय, म्हणून या सरकारला मोदी सरकार नाहीतर गजनी सरकार म्हणत असल्याचं उद्धव ठाकेर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT