udayanraje shivendraraje demands bjp candidate in satara lok sabha constituency SaamTV
लोकसभा २०२४

BJP Candidate : सातारा लाेकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रसेचा; उदयनराजे, शिवेंद्रराजे भूमिकेवर ठाम, आज निर्णयाक बैठक

ओंकार कदम

Satara Lok Sabha Election 2024 :

सातारा लाेकसभा मतदारसंघातील (satara lok sabha constituency) महायुतीमधील भाजप नेते उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) आणि शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje bhosale) हे दाेघेही मतदारसंघात भाजपचा उमेदवार (bjp candidate) असावा यासाठी आग्रही आहेत. उदयनराजे स्वत: निवडणुक लढवू इच्छितात तर शिवेंद्रराजेंनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने उमेदवार पक्षाचा असावा असे स्पष्ट केले आहे. या दाेन्ही नेत्यांपैकी उदयनराजे हे आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेणार आहेत. तसेच शिवेंद्रराजे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या निराेपावरुन मुंबईला त्यांच्या भेटीस गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लोकसभा मतदारसंघावर पहिल्यापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसने (Nationalist Congress Party) दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी वेळाेवेळी त्याबाबत भाष्य केले आहे. दूसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले हे भाजपकडून निवडणुक लढवू इच्छितात. परंतु अद्याप राष्ट्रवादीने हा मतदारसंघ भाजपकडे दिला नाही. त्यामुळे येथील उमेदवार काेणत्या पक्षाचा असणार हे निश्चित झालेले नाही.

दरम्यान दोन्ही पक्षांकडून उदयनराजे भाेसले यांच्या नावाला संमती मिळाल्याची खात्राशिर माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु उदयनराजे हे भाजपकडून लढण्यावर ठाम राहिल्याने पेच वाढला आहे अशी सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली. आता दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर सातारा लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे चित्र स्पष्ट हाेईल.

आमदार शिवेंद्रराजे भोसले मुंबईत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना बुधवारी रात्री अचानक बोलवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातारा लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रही भूमिका राजेंनी गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांच्याकडे केली हाेती. आज देवेंद्र फडणवीस आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बैठक होणार असल्याचे समजते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा-जावली, कोरेगाव, कराड उत्तर या तीन विधानसभा मतदार संघात आमदार शिवेंद्रराजेंचा प्रभाव असल्यानेच फडणवीस राजेंकडून लाेकसभेबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT