सातारा लाेकसभा मतदारसंघात अद्याप महायुती असाे अथवा महाविकास आघाडी काेणीच उमेदवार जाहीर केलेला नाही. उदयनराजेंनी निवडणुक बिनविराेध करण्याचा डाव आखला आहे का? असे राजेंना माध्यमांनी विचारताच त्यांचे (सगळ्यांचे) माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते देखील विचार करताहेत. आपण म्हणताे ना बच्चा समझ के छाेड दिया. आता हा बच्चा माेठा झाला आहे हे त्यांना समजलंय. मला माझं कार्य केले पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य केले पाहिजे. काही असलं तरी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत हाेईल असेही राजेंनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठीची जय्यत तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यात मतदारसंघात बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागात दाैरा करुन उदयनराजे भाेसले हे लाेकांपर्यंत त्यांचे विचार पाेहचवत आहेत. आजही त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी निवडणुक लढविणारच असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
उदयनराजे भाेसले म्हणाले प्रतिस्पर्धी काेणीही असाे शशिकांत शिंदे असाेत, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील अथवा पृथ्वीराज चव्हाण. वैचारिक मतभेद असले तरी या सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून सातारा लाेकसभा मतदारसंघात काेण उमेदवार असणारी याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.