Special Report Saam Digital
लोकसभा २०२४

Special Report : साताऱ्यात 'ट्रम्पेट'मुळे 'तुतारी'चा घात; ट्रम्पेटमुळे फुललं राजेंचं 'कमळ'?

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा विजय झाला. मात्र या विजयात ट्रमेम्ट अर्थात तुतारी सारख्याच चिन्हाचा वाटा अधिक असल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळालंय.

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. साताऱ्यात जय पराजयाचं गणित बदललं त्याला कारणीभूत ठरलंय ते निवडणुकीचं चिन्हं. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेचा घात झाला. तर भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा विजय झाला. या मतातील फरकाला कारणीभूत ठरलं ते ट्रम्पेट. काय घडलं साताऱ्यात पाहूया.

लोकसभा निवडणुकीत अनाकलनीय निकाल लागले खरे मात्र साताऱ्यातील निकाल एका निवडणूक चिन्हामुळे फिरला असल्याच स्पष्ट झालंय. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा विजय झाला. मात्र या विजयात ट्रमेम्प अर्थात तुतारी सारख्याच चिन्हाचा वाटा अधिक असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळालंय. ट्रम्पेट चिन्हावर संजय गाडे हे उमेदवार उभे होते.त्यामुळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेंचा घात झाला.

साताऱ्यातील तुतारीचं गणित कसं बदललं?

संजय गाडेंच्या ट्रम्पेटला 35 हजार 311 मतं

भाजपचे उदयनराजे भोसलेंना 5 लाख 71 हजार 134 मतं

शशिकांत शिंदेंना 5 लाख 38 हजार 363 मतं

तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हानं शिंदेचा घात

फक्त 32 हजार 771 मतांनी शिंदे पराभूत

रायगडमध्ये 2014 मध्ये अनंत गिते यांच्याही विजयात एकाच नावाचे म्हणजेच सुनील तटकरे नावाचे उमेदवार होते. त्यामुळे रायगडचा निकाल फिरल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यदा याच पॅटर्नचा तुतारीला साता-यात फटका बसल्याचं दिसंतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT