Special Report Saam Digital
लोकसभा २०२४

Special Report : ठाकरेंना मुस्लिमांची साथ?; मविआला अल्पसंख्याकांनी तारलं?

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चुरशीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.यात मविआनं 6 पैकी 4 जागा जिंकल्या. मात्र या विजयात मुस्लिमबहुल मतदारसंघातून मविआ उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाल्याचं स्पष्ट झालंय.

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असलेल्या मुंबईत मविआला 4 जागांवर यश मिळालंय. मात्र यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिमबहुल मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळाल्याचं दिसतंय. त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट होतंय..तर दुसरीकडे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चुरशीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.यात मविआनं 6 पैकी 4 जागा जिंकल्या. मात्र या विजयात मुस्लिमबहुल मतदारसंघातून मविआ उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मुंबईत यावेळी मुस्लिम वस्त्यांत बदलाचे नुसते वारे नव्हे तर त्सुनामी आल्याचं स्पष्ट झालं. मुस्लिम मतदार पहिल्यांदा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहीला. मुस्लिमबहुल भागात मिळवलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे दोन खासदार निवडून आले. तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयात अल्पसंख्याक समाजाने मोलाची भूमिका बजावली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

ठाकरे गटाचे अरविंद सावंत 53 हजार मतांनी विजयी

मुस्लिमबहुल मुंबादेवी आणि भायखळ्यातून मोठी आघाडी

मुंबादेवीतून 40 हजार मतांची आघाडी

तर भायखळ्यातून 46 हजारांची निर्णायक आघाडी

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

ठाकरे गटाचे संजय दिना पाटील 29 हजार 861 मतांनी विजयी

मुस्लिमबहुल मानखुर्द शिवाजीनगरमधून 87 हजार 971 मतांची निर्णायक आघाडी

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

ठाकरे गटाचे अनिल देसाई 53 हजार मतानं विजयी

मुस्लिमबहुल अणुशक्तीनगर, शीव, कोळीवाड्यातून एकूण 38 हजारांची निर्णायक आघाडी

काँग्रेसलाही तारले

वर्षा गायकवाडांचा 16514 मतांनी विजय झाला.

कुर्ला, चांदीवली, वांद्रे पूर्व, कलिना या मुस्लिमबहुल मतदारसंघातून 74 हजार मतांची निर्णायक आघाडी

1993 मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने धार्मिक तणाव निर्माण झाला. या दंगलीनंतर शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली. यामुळे मुस्लिम समाज कायमचा ठाकरेंपासून दूरावला. मात्र तीन दशकानंतर मुंबईतील हे चित्र बदलले असून मुंबईत पहिल्यांदा मुस्लिम वस्त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केलंय. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणूकीतही ठाकरेंसोबत राहिल्यास मविआ मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT