Maharashtra Politics Saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जिकडे तिकडे सूडाचं वार वाहतंय. अशातच अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यासारखे विरोधक आमने सामने आल्यानंतर एक वेगळच चित्र पाहायला मिळतंय.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics:

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जिकडे तिकडे सूडाचं वार वाहतंय. अशातच अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यासारखे विरोधक आमने सामने आल्यानंतर एक वेगळच चित्र पाहायला मिळतंय. यातून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजुनही जपली जात असल्याचं जाणवतंय.

2019च्या निवडणुकीनंतर ठाकरे-फडणवीसांचं बिनसलं. आधी फडणवीसांसोबत अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला आणि नंतर ठाकरेंचं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सूत जुळलं. सत्तानाट्याच्या संघर्षातून पेटलेला हा वणवा अजुनही धगधगतोय. शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात सुडाचं राजकारण पेटलंय.

मात्र अशा परिस्थितीतही अशी दृश्य बघायला मिळतात की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आजही शाबूत असल्याचं जाणवतं. आता शिरूरमधले कट्टर विरोधी उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांची भेट झाली. दोघांनीही एकाच मंचावर आल्यानंतर एकमेकांचे पाय धरले. एवढच नाही तर आढळरावांची तब्येत खालावलेली असताना कोल्हेंनी विचारपूस केल्याचंही कळलं.

असाच काहीसा प्रसंग जळगावातही पाहायला मिळाला. जळगाव विमानतळावर भाजप नेते अमित शाह येणार होते. भाजप उमेदवार स्मिता वाघ स्वागतासाठी विमानतळावर आल्या होता. तेव्हाच शरद पवारही समोर दिसल्यानंतर स्मिता वाघ यांनी पक्ष बाजूला ठेवून शरद पवारांचे आशीर्वाद घेतले.

हीच परिस्थिती बारामतीतही आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत असली तरीही प्रत्यक्षात हा सामना काका विरुद्ध पुतण्या, असा आहे. मात्र दोन्ही गटाच्या उमेदवार जेव्हा समोर येतात तेव्हा गळाभेट होते.

सांगलीत काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील मविआविरोधात दंड थोपटतात. मात्र ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील समोर येतात तेव्हा राजकीय संघर्ष विसरून एकमेकांची विचारपूस करतात. एकमेकांचा सन्मान राखतात.

पुण्याचं वारं तर नेहमीच वेगळं असतं. काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये वारंही जात नाही. मात्र पुण्यात प्रचार करून दमले म्हणून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे एकत्र बसून डोश्यावर ताव मारतात.

हीच खरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे.. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी हीच राजकीय संस्कृती जपली. सध्या महाराष्ट्रावर राजकीय सूडाचं मळभ दिसतंय. पण काळाच्या ओघात तेही पुढे सरकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT