Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: येत्या ८ दिवसात अनेक मोठ्या घडामोडी घडतील, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; ठाकरे गटाचं वाढणार टेन्शन?

Sanjay Shirsat News: येत्या 8 दिवसात अनेक घडामोडी घडतील, असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे गटाच्या काही आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असं ते म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Maharashtra Politics:

येत्या 8 दिवसात अनेक घडामोडी घडतील, असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे गटाच्या काही आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असं ते म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, ''मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात, त्यावर आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''मित्र पक्षाचे कार्यकर्ये आपल्यासोबत किंवा आपण त्यांच्यासोबत कसे रहावे यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठीची आहे, जी जिंकायची आहे.''  (Latest Marathi News)

युतीत काही जागांवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. यातच काही नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तर काही नेत्यांचं तिकीट अद्याप जाहीर न झाल्याने ते नाराज आहेत. याचबद्दल त्यांना विचारलं असतं ते म्हणाले आहेत की, ''थोड्या कुरघोड्या असतात. पण शिंदे साहेबांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा होइल. तुमची मागणीवर चर्चा होइल. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा.''

शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ''खडसेंना जाणीव झाली असेल की, आपला पक्ष हा आपला आहे. आता भाजपने त्यांच कसं स्वागत करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते आले तर फायदाच होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT