Praniti Shinde vs Ram Satpute News:  Saamtv
लोकसभा २०२४

Solapur Loksabha: वडिलांच्या पराभवाचा लेकीने वचपा काढला! सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय; राम सातपुते पराभूत

Solapur Loksabha Election Result 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा पराभव करत भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. ४ जून २०२४

राज्याच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर लोकसभेचा अंतिम निकाल समोर आला आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे अंतिम निकाल समोर येत आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला आहे. प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. या विजयासोबतच प्रणिती शिंदे यांनी सुशिलकुमार शिंदे यांच्या पराभवाचाही हिशोब चुकता केला आहे.

सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवार नसल्याने ऐनवेळी माळशिरसे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. प्रचारापासून ते निकाल लागेपर्यंत चर्चेत आलेल्या या महत्वाच्या लढतीत काँग्रेसने विजय मिळवला असून भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्यासोबत माढ्याचे विजयसिंह मोहिते पाटील तसेच आडाम मास्तर यांची ताकद मिळाली होती. राम सातपुते यांची सोलापुर भागात नवखा चेहरा म्हणून असलेली ओळख काँग्रेसच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचा विजय सोपा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT