praniti shinde saam tv news
लोकसभा २०२४

Praniti Shinde: 'वडिलांची पुण्याई अन् तिची मेहनत..',प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर आई उज्वलाताई झाल्या भावुक

Praniti Shinde Mother Reaction,Lok Sabha Result: प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर आई उज्वलाताई शिंदे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. भाजपला सोलापूर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करण्याची संधी होती. मात्र प्रणिती शिंदे यांनी मोठ्या मतधिक्क्याने विजय मिळवला आहे.

सोलापूर मतदारसंघाचा गड गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. मात्र यावेळी काँग्रेसने भाजपला आव्हान देण्यासाठी मजबूत उमेदवार मैदानात उतरवला. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांनी विजय मिळवला होता. यावेळी नवीन चेहरा म्हणून राम सातपुते यांना संधी दिली गेली होती. मात्र सोलापूरच्या जनतेने प्रणिती शिदेंवर विश्वास दाखवला आहे.

प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर त्यांची आई उज्वलाताई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ' प्रणितीने घेतलेली मेहनत, वडिलांची पुण्याई तिच्या यशाच्या कामी आली.' यासह सुशीलकुमार शिंदे यांनी देखील विजयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ' लोकशाही संपवण्याचा प्रयत्न संपवणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. यासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट, शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे शिंदे यांनी आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT