shrikant shinde criticized uddhav thackeray after filing nomination in kalyan loksabha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Kalyan Constituency: टोमणेवीर जन्माला आलेत; श्रीकांत शिंदेंनी सोडला थेट उद्धव ठाकरेंवर बाण

Shrikant Shinde News : खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी महायुतीच्या वतीने रॅली काढण्यात आली.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan Lok Sabha Election :

कल्याण लाेकसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र आलेत. ही युती विरोधकांना पोटात पोटसूळ उठवण्याचे काम करत आहे म्हणून खोटे आरोप करायचे, अफवा पसरायचं काम विरोधकांना राहिल्याचा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला. विरोधकांना टोमणे, टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरला नाही, टोमणे जास्त आहेत. टोमणेवीर जन्माला आलेत टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते आम्ही आमचं काम करत राहू असं खासदार शिंदेंनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी महायुतीच्या वतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी गदा फिरवून, शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन ताे फडकवत या मतदारसंघात मताधिक्याने विजयी मिळविणार असे नमूद केले. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. आई लता शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

श्रीकांत शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी कार्यकर्ते रोज शिवसेनेत प्रवेश करताहेत. इतके कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला सोडून का जाताहेत यात त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT