Loksabha Election 2024: |Uddhav Thackeray SAAM TV
लोकसभा २०२४

Shivsena UBT Candidate List : काँग्रेसचा दावा असलेल्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार; महाविकास आघाडीत तणाव वाढणार?

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने दावा केलेल्या तीन जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाही केले आहे. या तीन जागांमध्ये सांगली, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई वायव्य या जागांचा समावेश आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र ठाकरे गटाच्या पहिल्या यादीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने दावा केलेल्या तीन जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाही केले आहे. या तीन जागांमध्ये सांगली, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई वायव्य या जागांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

सांगलीच्या जागेवरुन विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सांगलीत काँग्रेसचं वर्चस्व असताना ठाकरे गटाचा उमेदवार इथे नको, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. सांगलीतून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी विश्वजीत कदम प्रयत्न करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवारांची आधीच घोषणा केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. आता सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा ठाकरे गटाने केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई दक्षिण मध्यमध्येही काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या इच्छुक असल्याची देखील चर्चा होती. मात्र येथून ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मुंबई वायव्यमधून ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे काँग्रेसचे संजय निरुपम आग्रही होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी याआधी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली त्याच वेळी संजय निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

शिवसेनेच्या १७ उमेदवारांची नावे

  1. बुलडाणा - नरेंद्र खेडेकर

  2. यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख

  3. मावळ- संजोग वाघेरे पाटील

  4. सांगली- चंद्रहार पाटील

  5. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

  6. संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

  7. धाराशीव - ओमराजे निंबाळकर

  8. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे

  9. नाशिक - राजाभाऊ वाजे

  10. रायगड - अनंत गीते

  11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत

  12. ठाणे - राजन विचारे

  13. मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील

  14. मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत

  15. मुंबई वायव्य - अमोल कीर्तिकर

  16. परभणी- संजय जाधव

  17. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT